LIVE UPDATES

युवकांनी व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा

दोडामार्ग येथे व्यसनमुक्ती अभियान संपन्न
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 26, 2026 09:09 PM
views 15  views

दोडामार्ग : मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्त भारत अभियानांतर्गत २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दोडामार्ग येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील ९० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

आजच्या काळात युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असून, देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. युवकांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे, त्यांच्यामध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच निरोगी आणि जबाबदार समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन जगदीश पाटील, प्राध्यापक शिवप्रसाद दीपक नाटेकर पानवळ कॉलेज, भूषण सावंत, संजय पाटील (मुख्याध्यापक, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय), प्रशांत चव्हाण, प्रमोद गवस, बुधाजी राळे, प्रा. मांगले सर (दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय) तसेच कामाक्षी महालकर (कोकण संस्था, प्रकल्प समन्वयक) हे मान्यवर उपस्थित होते.

युवक हे देशाचे भविष्य असून त्यांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व समजावून देणे ही काळाची गरज आहे. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक युवकाने स्वतःपासून सुरुवात करून समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी व्यसनाशी संबंधित कायदेशीर तरतुदी, व्यसन केल्यास होणारी कायदेशीर कारवाई याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन पाटील यांनी विविध प्रकारचे व्यसनकारक पदार्थ, त्यांच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांची सविस्तर माहिती दिली.

प्रा. शिवप्रसाद नाटेकर यांनी व्यसनाचा व्यक्तीच्या जीवनावर, आरोग्यावर आणि सामाजिक परिस्थितीवर होणारा परिणाम स्पष्ट करून व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी युवकांनी कोणत्या प्रकारे योगदान द्यावे, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी व्याख्याते गवस यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित इतर मान्यवरांनीही व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली. 

या कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्ती या विषयावर स्लोगन लिहिण्यासाठी सहभागी करून घेतले तसेच. नशामुक्तीसाठी प्रतिज्ञा व स्वाक्षरी मोहिमेचा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दोडामार्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भविष्यातही अशा प्रकारचे व्यसनमुक्ती जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. उत्साही वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.


ताजी बातमी

View all

उपोषणकर्ते राजाराम खोर्जुवेकर यांची प्रकृती खालावली
November 26, 2026
Devgad Crime News : घरगुती वादातून नाद धनगरवाडीत तिघांना मारहाण
November 26, 2026
२६/११ हल्ल्यातील शहिदांना आम्ही कणकवलीकरांनी वाहिली श्रद्धांजली
November 26, 2026
Kankavli police seize Goa-made liquor worth ₹2,800 during an operation in Kalamath, Sindhudurg district.
गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
November 26, 2026
संबंधित बातम्या

View all

उपोषणकर्ते राजाराम खोर्जुवेकर यांची प्रकृती खालावली
November 26, 2026
२६/११ हल्ल्यातील शहिदांना आम्ही कणकवलीकरांनी वाहिली श्रद्धांजली
November 26, 2026
देवगडमध्ये २ डिसेंबरला ‘क्षेत्रीय किसान गोष्टी’ कार्यक्रम
November 26, 2026
Chindar village in Sindhudurg preparing for its traditional Gawpalani festival
Chindar Village Gawpalani 2026 : तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव होतं रिकामं; चिंदरच्या गावपळणीची अशी आहे अनोखी परंपरा
November 26, 2026