LIVE UPDATES

गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

२,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 26, 2026 07:57 PM
views 105  views
Kankavli police seize Goa-made liquor worth ₹2,800 during an operation in Kalamath, Sindhudurg district.

कणकवली :  गोवा बनावटीची दारू विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी कलमठ येथील एका महिलेविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी २ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी संशयित सुनीता राजेंद्र धुत्रे (वय ५९, रा. कलमठ, बाजारपेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास कलमठ-बाजारपेठ परिसरात एका घराच्या बाजूला ही कारवाई केली.

यावेळी गोवा बनावटीची दारू विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी संबंधित दारू जप्त केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अस्मिता कारंडे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, संशयित सुनीता धुत्रे हिच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.


ताजी बातमी

View all

उपोषणकर्ते राजाराम खोर्जुवेकर यांची प्रकृती खालावली
November 26, 2026
युवकांनी व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा
November 26, 2026
Devgad Crime News : घरगुती वादातून नाद धनगरवाडीत तिघांना मारहाण
November 26, 2026
२६/११ हल्ल्यातील शहिदांना आम्ही कणकवलीकरांनी वाहिली श्रद्धांजली
November 26, 2026
संबंधित बातम्या

View all

Devgad Crime News : घरगुती वादातून नाद धनगरवाडीत तिघांना मारहाण
November 26, 2026
CJP leader Saurabh Das faces Look Out Notice over passport birthplace discrepancy
सौरभ दास यांच्या अडचणीत वाढ; केंद्र सरकारकडून 'लूक-आउट' नोटीस जारी, पासपोर्टमधील त्रुटींवर मागितले स्पष्टीकरण
November 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : सख्ख्या भावांच्या वादाचे पर्यवसन रक्तरंजित हाणामारीत
November 26, 2026
देवगड किल्ला परिसरात गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा
November 25, 2026