LIVE UPDATES

Chindar Village Gawpalani 2026 : तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव होतं रिकामं; चिंदरच्या गावपळणीची अशी आहे अनोखी परंपरा

आपल्‍याला हे माहित आहे का ?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 26, 2026 07:27 PM
views 40  views
Chindar village in Sindhudurg preparing for its traditional Gawpalani festival

मालवण : आपल्याला हे माहीत आहे का? महाराष्ट्रात एक असं गाव आहे, जिथली सुमारे साडेसात हजार लोकसंख्या अवघ्या तीन दिवसांसाठी आपले घरदार सोडून गावाबाहेर राहुट्यांमध्ये राहण्यासाठी जाते! ही आहे चिंदर गावाची शेकडो वर्षे जुनी, अंगावर शहारे आणणारी ऐतिहासिक 'गावपळण'.

श्री देव रवळनाथाच्या कौलाने ठरलेल्या मुहूर्तावर यंदा २ डिसेंबरपासून संपूर्ण चिंदर गाव तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी वेशीबाहेर पडणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनंतर बारा-पाच मानकऱ्यांच्या साक्षीने घेतलेल्या कौलानंतर गावात तयारीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या परंपरेचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, केवळ माणसंच नाही, तर घरातील गुरे-ढोरे, कुत्रे, मांजरे, कोंबड्या आणि संसारोपयोगी सामानही सोबत नेले जातात.

आचरा, त्रिंबक, मसुरे, वायंगणी आणि बांदिवडे परिसरात राहुट्या उभारून गावकरी निसर्गाच्या सान्निध्यात नवा संसार थाटतात. तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव ओस पडते. दर तीन ते पाच वर्षांनी येणारी ही गावपळण म्हणजे श्रद्धा आणि एकोप्याचा जिवंत सोहळा. इथे हिंदू बांधवांसोबतच ख्रिश्चन समाजही तितक्याच उत्साहाने सहभागी होतो. 

धावपळीच्या जीवनातून ब्रेक घेत भजन, संगीत, गप्पा आणि मनोरंजनाच्या माध्यमातून सारा गाव एक कुटुंब बनून आनंद साजरा करतो. गावपळणीच्या काळात जात, धर्म किंवा आर्थिक स्तर बाजूला सारून सर्व गावकरी एकत्र येतात. गावाबाहेर राहताना एकमेकांना मदत करणे, सुख-दुःख वाटून घेणे यातून गावातील सामाजिक एकोपा अधिक घट्ट होतो. आधुनिक जगातही आपल्या पूर्वजांचा वारसा जपणाऱ्या चिंदरची ही गावपळण खरंच अद्वितीय आहे.

संकलन - स्वप्निल परब

मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद

ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg News: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची दिर्बादेवी मंदिराला भेट
November 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Dodamarg Elephant Issue : सिंधुदुर्गातील हत्ती प्रश्न आता दिल्लीच्या दरबारात
November 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Vengurla News : वेंगुर्ल्यात २७, २८ नोव्हेंबरला तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन
November 26, 2026
Sindhudurg Collector Trupti Dhodmise reviewing District Annual Plan development works and fund utilisation with senior district officials at the Collector Office.
Sindhudurg News : जिल्हा वार्षिक योजनेतील कामे आणि निधी खर्चाचे नियोजन वेळेत करा
November 26, 2026
संबंधित बातम्या