LIVE UPDATES

२६/११ हल्ल्यातील शहिदांना आम्ही कणकवलीकरांनी वाहिली श्रद्धांजली

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 26, 2026 08:07 PM
views 41  views

कणकवली : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पोलीस सक्षमपणे पार पाडत आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, असे कृत्य नागरिकांनी केले नाही पाहिजे. २६/११ दहशतवादी हल्ला हा सागरी मार्गाने झाला होता. या हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता समुद्र किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली पाहिजे. तसेच भारताची एकता व अखंडिता ही संविधानामुळे टिकून आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी केले. 

२६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना गुरुवार २६ नोव्हेंबरला सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्यात नागरिकांनी मेणबत्त्या पेटून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, हवालदार पांडुरंग पांढरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, गोपुरी आश्रमाचे प्रा. राजेंद्र मुंबरकर, प्रा. हरिभाऊ भिसे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, संदीप सावंत, तनोज कळसुलकर, संजय बेलवलकर, डॉ. सुहास पावसकर, गितांजली कामत, शीतल मांजरेकर, अर्पिता मुंबरकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, विनायक सापळे, प्रशांत बुचडे, सुनील दळवी, सचिन सादये, सदाशिव राणे यांच्यासह पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 

अशोक करंबेळकर म्हणाले, २६/११ दहशतवादी हल्ला होऊन १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. आम्ही कणकवलीकर गेली १७ वर्षे या हल्ल्यात शहीद झालेल्यांना कणकवली पोलीस ठाण्यात परिसरात मेणबत्ता लावून श्रद्धांजली वाहत आहोत. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक व पोलिसांच्या प्रति कणकवलीकर संवेदनशील आहेत हे दिसून येते. भारतावर अशाप्रकारे हल्ले होऊ नये याकरिता नागरिकांनी वैयक्तिक, राजकीय मतभेद बाजूला ठेवून देशाच्या संरक्षणासाठी संघटितपणे काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरंभी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सर्वांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक मेस्त्री यांनी केले.


ताजी बातमी

View all

उपोषणकर्ते राजाराम खोर्जुवेकर यांची प्रकृती खालावली
November 26, 2026
युवकांनी व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा
November 26, 2026
Devgad Crime News : घरगुती वादातून नाद धनगरवाडीत तिघांना मारहाण
November 26, 2026
Kankavli police seize Goa-made liquor worth ₹2,800 during an operation in Kalamath, Sindhudurg district.
गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
November 26, 2026
संबंधित बातम्या

View all

उपोषणकर्ते राजाराम खोर्जुवेकर यांची प्रकृती खालावली
November 26, 2026
युवकांनी व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा
November 26, 2026
देवगडमध्ये २ डिसेंबरला ‘क्षेत्रीय किसान गोष्टी’ कार्यक्रम
November 26, 2026
Chindar village in Sindhudurg preparing for its traditional Gawpalani festival
Chindar Village Gawpalani 2026 : तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव होतं रिकामं; चिंदरच्या गावपळणीची अशी आहे अनोखी परंपरा
November 26, 2026