
दोडामार्ग :गोवा राज्याचे माजी जलसंपदामंत्री दयानंद मांद्रेकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय नारायण नाईक यांच्या पुढाकारातून दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी २१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वा. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती संजय नाईक यांनी दिली.
गेली अनेक वर्षे हत्तींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हा हत्तींच्या समस्येतून भयमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दोडामार्ग तालुक्यातील विविध क्षेत्रांत नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी, माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि निवृत्त कर्मचारी असे एकूण १५ मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जि.प. माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस, स्वराज्य सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, मोर्ले माजी सरपंच सुजाता संजय मणेरीकर, हेवाळे माजी सरपंच तथा प्रशासक साक्षी संदीप देसाई, शिंदे शिवसेना दोडामार्ग उप तालुकाप्रमुख मायकल लोबो, नामदेव गवस, रामदास नाईक, सुर्याजी झेंडे, गणपत दळवी, प्रशांत दळवी, अंकुश गवस, ज्ञानेश्वर सावंत, सूचन कोरगांवकर हे या बैठकीत तालुक्यातील नेतृत्व करणार असल्याची माहिती संजय नाईक यांनी दिली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








