
वेंगुर्ला : कोकणची अंबा म्हणून ख्याती असलेल्या रेडी येथील श्री देवी माऊली देवस्थानच्या हरिनाम सप्ताहाच्या आज सोमवार, २४ ऑगस्ट पाचव्या दिवशी देवीची पार्वती रुपात पूजा साकारण्यात आली आहे. देवीच्या या मनोहारी रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. श्री देवी माऊलीच्या पार्वती रूपातील अलंकारिक सजावटीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.











