LIVE UPDATES

किंजवडे ठाकूरवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 24, 2026 16:30 PM
views 98  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : किंजवडे ठाकूरवाडी  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांच्या सौजन्याने जि. प. प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम कै. हरी गुणाजी पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला.

शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमात नितीन पवार, भाई गावडे व अमित शहापुरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप परब, उपाध्यक्षा ऋतुजा परब, माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी प्रताप परब, महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा उर्मिला तळवडेकर तसेच कविता तळवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंदराव जाधव यांनी केले. त्यांनी नितीन पवार यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना मिळणारी ही मदत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. शिक्षणासाठी केलेली मदत हीच समाजसेवेची खरी ओळख असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक महेश इंगोले यांनी केले.