LIVE UPDATES

कणकवलीत ३० ऑगस्टला रक्तदान शिबिर

अशोक नारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 24, 2026 15:23 PM
views 45  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी अशोक अर्जुन नारकर यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त रविवारी ३० ऑगस्टला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशोक नारकर मित्रपरिवार, सिंधुदुर्ग मित्रप्रतिष्ठान शाखा कणकवली आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

श्री नारकर हे गेली काही वर्षे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करतात.याहीवर्षी हे शिबिर रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात होणार आहे. 

 सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.