LIVE UPDATES

Kolgao News : कोलगाव विद्यालयाला गतवैभव प्राप्त करून देणार

संस्थाचालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा निर्धार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 11:07 AM
views 477  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : कोलगाव माध्यमिक विद्यालयाला ३३ वर्षांची समृद्ध शैक्षणिक परंपरा लाभली आहे. या विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविला आहे. नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांमुळे विद्यालयाने नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या विद्यालयाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालक यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे.

मध्यंतरीच्या काळात काही तांत्रिक अडचणींमुळे संस्थेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू होता. मात्र, अलीकडेच नवीन संस्थाचालकांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत संस्थेच्या मागील ३३ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. तसेच सध्याच्या समस्या, शाळेची सद्यस्थिती आणि भविष्यातील विकासाच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

माजी विद्यार्थ्यांनी दाखविलेली संस्थेविषयीची आत्मीयता आणि घेतलेला पुढाकार यामुळे विद्यालयाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. याच बैठकीत माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना सुजाण नागरिक बनविणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातील आधुनिक आणि नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे तसेच रोजगाराभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना भविष्याच्या नव्या वाटा दाखविणे, यावर बैठकीत एकमत झाले.

विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि संस्थेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालक यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून विद्यालयाला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासोबतच आधुनिक काळाशी सुसंगत असे नवे स्वरूप मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर, डॉ. सौ. ज्योती तोरसकर, हेमंत वालकर, पूनम  नाईक ,अरविंद मेस्त्री ,नितेश पेडणेकर ,  संगीता पाटकर , प्रशांत  गोवेकर,नितीन पेडणेकर, संगीता पाटकर,प्रवीण सावंत ,कृष्णा  करमलकर ,महादेव  सावंत , योगेश करमलकर ,  प्रांजल  ढिळवे , पूर्वा  सावंत आदी उपस्थित होते . 







ताजी बातमी

View all

Police and bomb detection squad conduct a security check at Rajapur Civil Court in Ratnagiri following a bomb threat email.
Rajapur Court Bomb Threat : रत्नागिरी, सिंधुदुर्ग पाठोपाठ राजापूर न्यायालयालाही बॉम्बची धमकी
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi Railway Station : रेल्वे स्थानकावरील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg District Court : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
November 02, 2026
Hero Destini 110 Classic Edition scooter launched in India with new retro design, colour options and 110cc engine.
हिरोची नवीन 'डेस्टिनी ११० क्लासिक एडिशन' लॉन्च, नवा रेट्रो लूक अन् दमदार प्रीमियम फीचर्स; जाणून घ्या खासियत
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi Railway Station : रेल्वे स्थानकावरील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Devgad News : धोपटेवाडीत नगरपंचायतीच्या श्रमदानातून वनराई बंधारा
November 02, 2026
Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026