LIVE UPDATES

Devgad News : धोपटेवाडीत नगरपंचायतीच्या श्रमदानातून वनराई बंधारा

लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचा सहभाग
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 03:29 PM
views 92  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच जलसंधारणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक १४ मधील धोपटेवाडी येथे नगरपंचायतीच्या अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. नगरपंचायत हद्दीतील हा दुसरा, तर धोपटेवाडीतील पहिला वनराई बंधारा ठरला आहे.

या श्रमदान उपक्रमात नगराध्यक्षा साक्षी प्रभू, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, गटनेते शरद ठुकरूल, मुख्याधिकारी हरिदत्त माने, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, नगरसेवक संतोष तारी, माजी आमदार अजित गोगटे, राजा भुजबळ, योगेश चांदोस्कर, योगेश पाटकर आणि पारस जाधव यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तसेच धोपटेवाडीतील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे, पाण्याचा योग्य वापर करणे आणि भूजल पातळीत वाढ होण्यास मदत करणे, हा वनराई बंधारा उभारण्यामागील मुख्य उद्देश आहे. पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे प्रयत्न महत्त्वाचे असून, या उपक्रमातून पाणी बचतीचा संदेश देण्यात आला.


ताजी बातमी

View all

कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026
Kankavli Water Conservation : कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ
November 03, 2026
Devgad Fishermen Protest : कायकिंग पर्यटन आणि पारंपरिक मासेमारीचा वाद ऐरणीवर
November 03, 2026
Sindhudurg Forest Department seizes tiger teeth and leopard claws during a wildlife trafficking crackdown in Kudal.
Kudal Wildlife Smuggling Racket : कुडाळ बस स्थानकावर वाघनखे, दातसुळ्यांच्या तस्करीचा वनविभागाने केला पर्दाफाश
November 03, 2026
संबंधित बातम्या

View all

कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026
Kankavli Water Conservation : कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ
November 03, 2026
Devgad Fishermen Protest : कायकिंग पर्यटन आणि पारंपरिक मासेमारीचा वाद ऐरणीवर
November 03, 2026
Sindhudurg Collector Trupti Dhodmise inspects grass harvesting and fodder storage demonstration at Kasal.
कसाल येथील गवत कापणी प्रात्यक्षिकास जिल्हाधिकारी, सीईओ, उपाध्यक्षांनी दिली भेट
November 03, 2026