
सावंतवाडी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावंतवाडी शहर व परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून 'विठू माऊली'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाजप युवा नेते विशाल परब यांनी या निमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेतले.
या औचित्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीमधील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर श्री. परब यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नागरिक आणि भाविक पांडुरंगाच्या नामघोषात तल्लीन होऊन मोठ्या उत्साहाने सोहळ्यात सहभागी झाले होते.











