LIVE UPDATES

Devgad News : शिरगाव तांत्रिक विद्यालयाच्या नामकरणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी

कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांच्या नावाची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 30, 2026 01:12 PM
views 44  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : शिरगाव येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाला माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाच्या चर्चेमुळे शिरगाव परिसरात नाराजी व्यक्त होत असून,या विद्यालयाच्या नामकरणाचा निर्णय घेताना गावाचा शैक्षणिक इतिहास आणि योगदानकर्त्यांच्या त्यागाची दखल घ्यावी, अशी मागणी शिरगाव येथील रघुनाथ चव्हाण यांनी केली आहे.

या विद्यालयाच्या उभारणीसाठी शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांनी स्वतःचा बंगला आणि जमीन शासनाला विनामोबदला दिली होती. त्यामुळे विद्यालयाला त्यांचे नाव देण्याचा विचार शासनाने प्राधान्याने करावा,असे आवाहन त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

शिरगावच्या शैक्षणिक विकासात कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने त्यांनी स्वतःच्या मालमत्तेचा त्याग केला. तसेच कै. गजानन साटम ऊर्फ जी. टी. काका यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनीही शैक्षणिक कार्यात योगदान दिले आहे. अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे ही समाजाची नैतिक जबाबदारी असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या सार्वजनिक कार्याचा सन्मान करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, एका व्यक्तीचा सन्मान करताना शैक्षणिक संस्थेच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष त्याग करणाऱ्या व्यक्तींचे योगदान दुर्लक्षित होता कामा नये. नामकरण हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून तो गावाच्या इतिहासाशी, अस्मितेशी आणि भावी पिढ्यांना मिळणाऱ्या प्रेरणेशी संबंधित विषय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी विद्यालयाच्या स्थापनेची मूळ कागदपत्रे, जमीन हस्तांतरणाचे अभिलेख आणि संबंधित ऐतिहासिक नोंदींची अधिकृत पडताळणी करावी. नामकरणासंदर्भातील शासनाचा प्रस्ताव व निर्णय सार्वजनिक करावा. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि सर्व संबंधित घटकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

गावाच्या इतिहासाचा सन्मान राखत सर्वमान्य निर्णय घ्या! नामकरणाचा प्रश्न केवळ चर्चेपुरता मर्यादित न ठेवता ग्रामस्थांनी एकत्र येऊन शांततामय आणि लोकशाही मार्गाने आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन रघुनाथ चव्हाण यांनी केले आहे. कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांच्या योगदानाचा गौरव व्हावा आणि तांत्रिक विद्यालयाला त्यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, हीच शिरगावच्या ग्रामस्थांची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


ताजी बातमी

View all

Nilesh Rane addresses a press conference in Kudal and responds to Navnath Ban amid Mahayuti alliance tensions.
Nilesh Rane Navnath Ban : 'नवनाथ बन यांनी स्वतःवर ताबा ठेवावा' निलेश राणेंचा थेट इशारा
October 30, 2026
Nitesh Rane performs the groundbreaking ceremony for a new garden project at historic Devgad Fort in Sindhudurg.
देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान
October 30, 2026
Trans Bharat Aviation helicopter reported missing while flying from Badrinath to Dehradun with six people on board.
बद्रीनाथहून डेहराडूनला जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता! वैमानिकासह ६ जणांचा समावेश; एसडीआरएफ, लष्कराकडून शोधमोहीम सुरू
October 30, 2026
शिरगावच्या तांत्रिक विद्यालयाच्या नामकरणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

Nitesh Rane performs the groundbreaking ceremony for a new garden project at historic Devgad Fort in Sindhudurg.
देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान
October 30, 2026
शिरगावच्या तांत्रिक विद्यालयाच्या नामकरणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Dodamarg News : 'माझे गाव नशामुक्त गाव' अभियानांतर्गत जनजागृतीपर रॅली
October 30, 2026
सिंधुदुर्गात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती रॅली संपन्न
October 30, 2026