
दोडामार्ग : ग्रामपंचायत साटेली भेडशी यांच्यावतीने 'माझे गाव नशामुक्त गाव' अभियानांतर्गत गुरुवारी येथील बाजारपेठेत जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. या रॅलीत शाळकरी विद्यार्थी,शिक्षक, आशा,अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगट, सी .आर. पी सदस्य आदी सहभागी झाले होते.
माझे गाव नशामुक्त गाव,निरोगी समाज - समृद्ध भविष्य
निरोगी कुटुंब, आनंदी जीवन, चांगले आरोग्य, उज्ज्वल भविष्य निर्माण होण्यासाठी दारू, तंबाखू, गुटखा, अंमली पदार्थ, ड्रग्स याला प्रतिबंध व भावी पिढीला नशा, व्यसनाधीनतेपासून रोखण्यासाठी नशा मुक्त गाव अभियानअंतर्गत नशा मुक्त गाव जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.
या रॅलीचे आयोजन ग्रामपंचायत साटेली भेडशी यांनी केले होते. यावेळी सरपंच छाया धर्णे, उपसरपंच चंद्रकांत मयेकर,ग्रामविकास अधिकारी ज्योती डोंगरदिवे, ग्रामपंचायत सदस्य संपदा गवस,शोभना जुवेकर, विष्णू सुतार,गणपत डांगी,न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक,सहा. शिक्षक श्री. सावंत,अमित कर्पे, श्री.गावडे, केंद्र शाळा साटेली भेडशी मुख्याध्यापक पूनम पालव,शिक्षक दीपक दळवी,आरोग्य सेवक, सेविका,शाळकरी विद्यार्थी,शिक्षक, आशा,अंगणवाडी सेविका ,मदतनीस, बचतगट,सी आर पी सदस्य,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
ही रॅली ग्रामपंचायत कार्यालयाकडून सुरुवात करून पुढे साटेली भेडशी बाजारपेठ ते परमे रोडवरील हनुमान मंदिर कडून माघारी फिरत पुढे खालचा बाजार दामोदर पर्यंत अशी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी नशामुक्त जनजागृतीपर फलक हाती घेत घोषवाक्य म्हणत नशेमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती देत स्वच्छ, सुरक्षित आणि नशामुक्त गाव घडवा असे आवाहन केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








