
सावंतवाडी : शेर्ले तेलीवाडी येथील ग्रामस्थांनी स्ट्रीट लाईटवरील झाड, वेली हटविण्याबाबत ग्रामपंचायतकडे वारंवार अर्ज करूनही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत ही सफाई केली. तसेच बंद अवस्थेत असलेल्या लाईट सुरु करून घेतल्या. यावेळी तेलीवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाच्या निष्काळजीपणा बाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना पुढाकार घ्यावा लागल्याचे त्यांनी बोलून दाखवले.












