LIVE UPDATES

चराठे येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात

जलसंधारणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 08:01 PM
views 44  views

सावंतवाडी : चराठे येथे ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून लोकसहभागाच्या माध्यमातून वनराई बंधारा बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या वनराई बंधारे व कच्चे बंधारे यांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची ‘पालकमित्र’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

त्यानुसार चराठे गावासाठी पालकमित्र म्हणून वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची पाहणी केली व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी चराठे गावच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, वनरक्षक सुशांत चोथे, अक्षय कुंभार तसेच इतर वनकर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या अशा वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यास, जमिनीतील ओलावा टिकविण्यास तसेच शेती व परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यास मदत होणार आहे. 'लोकसहभागातून जलसंधारण, जलसंधारणातून समृद्ध गाव’ या संकल्पनेतून वनविभाग व ग्रामस्थांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

कुडाळमध्ये शिवसेना शहरच्यावतीने जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा २०२६चे आयोजन
November 05, 2026
सातार्डा चेकपोस्ट दारू तस्करी प्रकरणात आणखी तिघांना अटक
November 05, 2026
नेरूरमध्ये ७ नोव्हेंबर रोजी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन
November 05, 2026
नेरूर मतदारसंघातील पशुपालक शेतकऱ्यांना मोफत मका बियाण्यांचे वाटप
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

कुडाळमध्ये शिवसेना शहरच्यावतीने जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा २०२६चे आयोजन
November 05, 2026
नेरूरमध्ये ७ नोव्हेंबर रोजी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन
November 05, 2026
नेरूर मतदारसंघातील पशुपालक शेतकऱ्यांना मोफत मका बियाण्यांचे वाटप
November 05, 2026
जयंत पाटलांची पोलखोल करणार
November 05, 2026