LIVE UPDATES

कुडाळमध्ये शिवसेना शहरच्यावतीने जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा २०२६चे आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 09:34 PM
views 12  views

कुडाळ : शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने आगामी काळात एका भव्य जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेविषयी नागरिकांमध्ये आणि कलाकारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.  

ही स्पर्धा दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता कुडाळ एसटी स्टँड येथील गांधी चौक येथे पार पडणार आहे. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे यामध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात आले नसून प्रवेश विनामूल्य आहे.  

स्पर्धेतोत्साही कलाकारांसाठी रोख रकमेची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक: ५०,००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांक: ३०,००० रुपये व चषक, तृतीय क्रमांक: १५,००० रुपये व चषक  

स्पर्धेचे नियम व अटी

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांसाठी काही महत्त्वाचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी रात्री ९:३० वाजेपर्यंत येणे बंधनकारक असून, उशीरा आल्यास १० गुण कमी केले जातील. तसेच सादरीकरणात नरकासूराची संपूर्ण प्रतिमा असणे आणि नरकासूर वध करणे आवश्यक आहे.

पौराणिक कथेचा आधार घेऊन सादरीकरण करावे लागेल, ज्यामध्ये गरजेनुसार थोडाफार बदल करण्यास हरकत नाही. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी जास्तीत जास्त १५ मिनिटांची वेळ दिली जाईल. विशेष म्हणजे, थर्माकोल किंवा फायबरचा नरकासूर गृहीत धरला जाणार नाही, मात्र अलंकार बनवण्यासाठी थर्माकोलचा वापर करता येईल. ही स्पर्धा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित असून, एकदा सादरीकरण सुरू झाल्यावर ते पुन्हा करता येणार नाही. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.  

गुणदान पद्धत (एकूण १०० गुण):

नरकासूर प्रतिमा - २० गुण  

सादरीकरण / नरकासूर वध - ३० गुण  

वेषभूषा / रंगसंगती - १० गुण  

चल चित्र - १० गुण  

नाविन्यपूर्ण / वैशिष्ट्यपूर्ण - १० गुण  

स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर येणे - १० गुण  

विषय / प्रश्नोत्तर - १० गुण  

स्पर्धेबाबत अधिक माहिती किंवा नोंदणीसाठी आबा धडाम (९४०४१६६८६८) किंवा चेतन पडते (७२१८२४२९९९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.