
सावंतवाडी : पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्यावरून गुरुवारी झालेल्या मासिक बैठकीत सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेना नगरसेवकात शाब्दिक चकमक झाली. पाणीपुरवठा विभागातील बिले मंजुर झाली नाहीत त्यामुळे सभापती प्रतिक बांदेकर निर्दोष आहेत. पाणीपुरवठा समितीतील सदस्यानांही हे माहित आहे असे नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी सांगितले.
चर्चेवेळी शिवसेना नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी १७ लाखांची बिले मंजूरच झाली नसल्याचे सांगितले असता सभापती सुधीर आडीवरेकर यांनी मग तुम्ही बांदेकर यांचा राजीनामा का मागितला ?, तुम्ही नाहक बदनामी का केली ? असा सवाल उपस्थित करत धारेवर धरले.
शिवसेनेचे गटनेते बाबू कुडतरकर यांनी आम्ही राजीनाम्याची मागणी केली हे सत्य आहे. पण, ते निर्दोष असतील तर तुम्ही राजीनामा का घेतला ? असा सवाल केला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांत शाब्दिक चकमक उडाली. पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार राजीनामा घेण्यात आला आहे. या संदर्भात चौकशी करण्यात येईल त्यानंतर सत्य बाहेर निघेल असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी नगरपरिषदेची मासिक बैठक नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.
या सभेत पाणीपुरवठा विभागाचे सभापती प्रतिक बांदेकर यांनी दिलेला राजीनामा मंजूर करून नवीन सभापती नियुक्ती बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचा होता. यासंदर्भातील विषय आजच्या सभेत आला. यावर झालेल्या चर्चेत सत्ताधारी गटाच्या नगरसेविका सुनीता पेडणेकर यांनी काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांच्याकडे पाणी पुरवठा विभागातील गैरव्यवहाराबाबत पुरावे आहेत ते त्यांनी सादर करावेत असे सांगितले.
यावेळी नगरसेवक श्री. शेख यांनीही सभापती प्रतीक बांदेकर हे निर्दोष असून या सर्वाला मुख्याधिकारी जबाबदार आहेत. चौकशी केल्यास ते स्पष्ट होईल, असे सांगितले. तर पाणीपुरवठा विभागातील बिले मंजुर झाली नाहीत. त्यामुळे बांदेकर निर्दोष आहेत. पाणीपुरवठा समितीतील सदस्यांनाही हे माहित आहे असे सांगितले.
यावेळी शिवसेना नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी पाणीपुरवठा विभागातील ती बिले मंजूरच झाली नसल्याचे सांगितले. यावेळी सत्ताधारी सुधीर आडीवरेकर यांनी आक्षेप घेत तुम्ही राजीनामा का मागितला ? नाहक बदनामी केली ? पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असा आरोप करत धारेवर धरले. यावेळी सुनिता पेडणेकर यांनी बांदेकर यांचा राजीनामा घेऊ नये अशी सूचना केली. तर शिवसेना गटनेते बाबू कुडतरकर यांनी सभा पटलावर विषय एक असताना भलती चर्चा कशासाठी ? असा सवाल केला.
आम्ही राजीनाम्याची मागणी केली हे सत्य आहे. पण, ते निर्दोष असतील तर तुम्ही राजीनामा का घेतला ? असा सवाल केला .यावेळी नगराध्यक्ष भोसले यांनी पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार राजीनामा घेण्यात आला आहे. या संदर्भात चौकशी करण्यात येईल, त्यानंतर सत्य बाहेर निघेल असे स्पष्ट केले. प्र.मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे स्पष्ट करत आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले. या चर्चेत भाजपच्या दुलारी रांगणेकर, मोहिनी मडगावकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी भाग घेतला. शिवसेना नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी आपण चौकशीबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होत असे स्पष्ट केले.
तसेच गाडगेबाबा भाजी मंडईच्या नवीन इमारतीच्या कामाच्या ठिकाणी वाहन तळाच्या भागात वॉटरप्रूफिंग आणि अन्य कामासह उबाठा शिवसेनेचे देवा टेमकर यांनी अनेक ठेकेदार बिलोदराने कामे घेतात. त्यामुळे ही कामे दर्जाहीन होत आहेत असा आरोप केला.
शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर यांनीही कामाचा दर्जा योग्य रहावा यासाठी बिलोदराने कामे देण्यात येऊ नये, तसा अधिकार नगराध्यक्षांना असल्याचे सांगितले. नगराध्यक्षांनीही यापुढे बिलोदराने कामे देण्यात येणार नाही अस स्पष्ट केले.
उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी कुडतरकर यांची सूचना नोंद करण्यात यावी असे स्पष्ट केले. तर सर्वोदय नगर आणि गणेश नगरमधील रस्ता कामे त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्षांकडे केली. इंदिरा गांधी व्यापारी संकुलनात दुकान गाळ्यांवर चर्चा झाली. तर, एम.एन.जी.एल कंपनीचे कार्यालय सावंतवाडी मध्ये नसल्याने अनेक ग्राहकांना तक्रार नोंदवण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे हे कार्यालय सावंतवाडी सुरू व्हावे यासाठी आपण लक्ष घालावे अशी मागणी नगरसेविका नीलम नाईक यांनी केली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








