
कुडाळ : नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी नेरूर ग्रामपंचायत हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल यांच्या शुभहस्ते पशुपालक शेतकऱ्यांना मोफत मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, तसेच महिला बालकल्याण व रुग्ण कल्याण समिती सदस्य रश्मी नाईक आणि ग्रामपंचायत सदस्य राजन नारिंग्रेकर उपस्थित होते.
पशुधनाला सकस आणि पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पशुवैद्यकीय विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमा दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कसालकर, डॉ. ओहोळ, डॉ. बांबर्डेकर, डॉ. खवणेकर, डॉ. केरकर आणि डॉ. मुंज यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाला नेरूर मतदारसंघातील पशुपालक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या वाटप सोहळ्याला उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या या संयुक्त उपक्रमाबद्दल स्थानिक पशुपालकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








