
कुडाळ : नेरूर पंचक्रोशीत 'रणझुंझार मित्र मंडळ' आणि जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने "कलेचा देव कलेश्वर - भव्य नरकासुर स्पर्धा २०२६" (वर्ष दुसरे) चे आयोजन शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ ते १० या वेळेत नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. यात प्रथम पारितोषिक २०,००० रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक १५,००० रुपये व चषक, तृतीय पारितोषिक १०,००० रुपये व चषक, उत्तेजनार्थ पारितोषिक १,००० रुपये (इतर सर्व सहभागी मंडळांसाठी) निश्चित करण्यात आली आहेत.
स्पर्धा नेरूर पंचक्रोशीपुरती मर्यादित असून, सहभागी होणाऱ्या संघांनी नरकासुर मूर्ती सायंकाळी ८ वाजेपर्यंत स्पर्धास्थळी आणणे बंधनकारक आहे. सादरीकरणाची वेळ १० मिनिटे असून, पौराणिक कथेवर आधारित नरकासुर वधाचा समावेश असणे आवश्यक आहे. कल्पेश मार्गी (8390616760), प्रविण नेरुरकर (9422948024), संतोष परब (9370983003), अमोल शुंगारे (8605464056), कृष्णा पाटकर (9356022387) यांच्याशी संपर्क करावा.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








