
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील पाझर तलाव, जमीन प्रकल्प वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या दौऱ्यावरून कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी जयंत पाटलांवर अत्यंत तीव्र शब्दांत राजकीय हल्ला चढवला आहे. जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने आणि शेतकरी उद्ध्वस्त करणारे नेते असून ते सिंधुदुर्गातील प्रश्न काय सोडवणार, असा थेट सवाल राणेंनी उपस्थित केला.
आमदार निलेश राणे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्या आजच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरून जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काजू बोर्डाच्या पैशांवरून गंभीर आरोप केले. कोकणासाठी स्थापन करण्यात आलेल्या काजू बोर्डाच्या ३५ ते ४० कोटी रुपयांच्या निधीवर आणि सबसिडीवर जयंत पाटलांनी डल्ला मारल्याचा थेट आरोप निलेश राणे यांनी केला.
'स्वतःचा मतदारसंघ दिवाळखोरीत नेला' : निलेश राणे
निलेश राणे म्हणाले की, जयंत पाटलांनी सांगलीतील जमिनी विकल्या आणि स्वतःचा मतदारसंघ दिवाळखोरीत ढकलला. असे नेते पिंगुळीतील स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोकणात येत आहेत, हे हास्यास्पद आहे. काजू बोर्डाच्या पैशांवरून गंभीर आरोप केले. कोकणासाठी स्थापन करण्यात आलेल्या काजू बोर्डाच्या ३५ ते ४० कोटी रुपयांच्या निधीवर आणि सबसिडीवर जयंत पाटलांनी डल्ला मारल्याचा थेट आरोप निलेश राणे यांनी केला. स्थानिक विरोधकांचे अस्तित्व संपल्याची टीका केली.
ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि स्थानिक नेत्यांची ताकद संपल्यामुळेच त्यांना बाहेरून नेते आणावे लागत आहेत. आधी राजू शेट्टींना आणले आणि आता जयंत पाटलांना आणले, यावरून स्थानिक नेतृत्वाची जनतेतील पत संपल्याचे स्पष्ट होते, असे राणे म्हणाले.
विधानसभेत मुद्दा मांडण्याच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटील हा विषय विधानसभेत मांडणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना राणे म्हणाले, "जयंत पाटील यांना मी काडीमात्र किंमत देत नाही. इतकी वर्षे अर्थमंत्री राहूनही ते सभागृहात ९० टक्के भाषणे कागदावरून वाचून दाखवतात. त्यांनी खुशाल हा मुद्दा विधिमंडळात मांडावा. आम्हीसुद्धा सभागृहात आहोत; त्यांनी सांगलीत जमिनी कशा हडपल्या, पश्चिम महाराष्ट्र कसा गिळला आणि कारखान्यांच्या नावाखाली कशा सबसिड्या लाटल्या, याचा पर्दाफाश आम्ही सभागृहात करू. तुम्ही सुरुवात करा, शेवट मी करेन." असा थेट इशारा दिला आहे.
साखर कारखाने उद्ध्वस्त केल्याचा निलेश राणेंचा आरोप
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने आणि तिथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अशा नेत्यांनी उद्ध्वस्त केले असून, आमचे हात स्वच्छ आहेत, अशा शब्दांत राणेंनी पाटलांना खुले आव्हान दिले. दरम्यान, पिंगुळीतील ग्रामस्थांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, पाझर तलाव दूषित होऊ देणार नाही आणि पायवाटेचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत प्रकल्पाचे काम स्थगित ठेवण्याचे थेट आदेश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहितीही निलेश राणे यांनी दिली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








