LIVE UPDATES

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 01, 2026 19:58 PM
views 12  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात आज पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, आरती देसाई यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.