LIVE UPDATES

सावंतवाडी नगरपरिषद अॅक्शन मोडमध्ये

विक्रेत्यांकडून प्लास्टिक साहित्य जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 01, 2026 13:02 PM
views 260  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत शहरातील आठवडा बाजार परिसरात विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने विविध विक्रेते व व्यावसायिकांची तपासणी करून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, सिंगल युज प्लास्टिक साहित्य तसेच नियमबाह्य प्लास्टिक वस्तूंचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. 


संबंधित विक्रेत्यांकडून प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून नियमानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. सावंतवाडी शहर परिसरात प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरण संवर्धनास चालना देणे, तसेच स्वच्छ व प्रदूषणमुक्त शहर निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. नगरपरिषदेने सर्व व्यापारी, विक्रेते व नागरिकांना कापडी पिशव्या, कागदी पिशव्या व इतर पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यापुढेही प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक कठोरपणे करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमितपणे तपासणी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत देण्यात आला आहे.