LIVE UPDATES

देवगडात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

7.18 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 01, 2026 14:15 PM
views 1078  views

देवगड : देवगड पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  धडक कारवाई करत गोवा व महाराष्ट्र बनावटीच्या अवैध दारूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ₹7,18,560 किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली असून तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० जून २०२६ रोजी रात्री सुमारे १०.०५ वाजता मिठबाव येथील वळंजू यांच्या कॉम्प्लेक्समधील एका खोलीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोजा, बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांनी सहभाग घेतला होता.

या प्रकरणात श्रीकांत चव्हाण (रा. मिठबाव, ता. देवगड), विनोद वळंजू (रा. देवगड) आणि पप्पू कुडतरकर (रा. कुडाळ) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई), ८१ व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.