LIVE UPDATES

कुडाळात उद्या देवळी समाज हितवर्धक मंडळाची वार्षिक सभा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 08, 2026 15:26 PM
views 40  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : जिल्हा देवळी समाज हितवर्धक मंडळ, सिंधुदुर्ग ची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या, शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) दुपारी ३:३० वाजता एम.आय.डी.सी. रेस्ट हाऊस, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सभा मंडळाचे अध्यक्ष राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

या सभेला मंडळाच्या सर्व अधिकृत सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राजन नाईक यांनी केले आहे.सभेबाबत अधिक माहितीसाठी मंडळाचे सचिव  विष्णू चौकेकर (मोबाईल क्र. ९४०३५९५३०५) यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती केली आहे.