
सावंतवाडी : मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर व सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी गोवा मेडिकल कॉलेजला भेट दिली. गोव्यात निधन झालेले चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे पार्थिव सध्या 'जीएमसी'मध्ये ठेवण्यात आले असून आमदार आरोलकर यांनी तिथे जाऊन नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार जीत आरोलकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट आणि दिग्गज अभिनेतेच नव्हते, तर समाजाशी नाळ जोडलेले एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. गोव्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि वेगळे नाते होते. गोव्याची भूमी, इथली संस्कृती आणि लोकांविषयी त्यांना विशेष आपुलकी होती.
त्यांच्या निधनाने नाट्य व चित्रपट क्षेत्राची कधीही भरून न येणारी मोठी हानी झाली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून कलाक्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार आरोलकर यांनी नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा देत ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना केली.












