
सिंधुदुर्ग : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे पार्थिव गोवा हॉस्पिलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्याची तयारी करण्यात आली आहे. यानंतर नाना पाटेकर यांचे पार्थिव मोपा विमानतळावर नेण्यात येणार आहे.
विशेष विमानाने नानांचे पार्थिव आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पुणे विमानतळावर आणले जाईल. त्यानंतर सिंहगड रस्ता मार्गे खडकवासल्याजवळील डोणजे फार्महाऊसवर पार्थिव नेण्यात येईल. प्रवासाचा वेळ, संभाव्य वाहतूक कोंडी आणि व्हीआयपींचा ताफा लक्षात घेता नानांवर आज गुरुवारी रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.
नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज गुरुवारीच पुण्यात अंत्यसंस्कार पार पडतील. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस दलाच्या विशेष तुकडीकडून नानांना मानवंदना दिली जाईल. अंत्यविधी आज रात्रीच संपन्न होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.














