
सावंतवाडी : भाजपच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे शित, उष्ण, मध्यम युद्ध नसून उलट शिवसेना नगरसेवकांतच दोन गट आहेत. शहरात जनाधार न मिळाल्याने असलेल्या पोटशोळातून टीका केली जात असल्याचा पलटवार शहर भाजपचे प्रवक्ते ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी केला. शिवसेना नगरसेवक संजू परब व गटनेते बाबु कुडतरकर यांच्या टीकेचा समाचार त्यांनी घेतला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ॲड. भांबुरे म्हणाले, भाजपचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी तांत्रिक मुद्यावर प्रेस घेतली होती. कोणत्याही प्रकारे काम बंद व्हावं असं म्हटलं नाही. तर झालेल काम योग्य प्रकारे झालं की नाही याची माहिती मिळावी व होणार काम योग्य पद्धतीने व्हावे अशी त्यांनी इच्छा आहे. मात्र, यावर शिवसेना नगरसेवक संजू परब व गटनेते बाबु कुडतरकर यांनी यांनी टीका केली.
खरंतर, उपनगराध्यक्षांच्या पत्रकार परिषदेवर बाबु कुडतरकर यांचे उत्तर आलेलं असताना पुन्हा नगरसेवक संजू परब यांनी प्रेस का घेतली हा प्रश्न आहे. त्यामुळे खरं शितयुद्ध शिवसेनेतच चालू असल्याचे दिसत. नगरपरिषदेच्या सभागृहातील प्रमुख पदाधिकारी जेव्हा उत्तर देतो त्यानंतर पुन्हा नगरसेवकांनी मत का मांडल ? हा प्रश्न असून शिवसेना नगरसेवकांतच खरं राजकीय शितयुद्ध सुरू आहे.
दरम्यान, भाजप हा परिवार आहे. बुथ कार्यकर्ता ते पंतप्रधान हा परिवार असून आमच्यात कोणतही शित, उष्ण युद्ध नाही, भाजपात वाद नाहीत. तसेच सावंतवाडीचा सत्यानाश होतोय अशी विधानं करण माजी नगराध्यक्षांना शोभणारी नाहीत. आमच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांत कोणताही वाद नाही. अंत्योदयाचा उद्देश घेऊन आम्ही काम करत असून जनहिताच्या पलिकडे दुसरा कोणताही उद्देश आमचा नाही. मात्र, काहीजणांकडून राजकीय स्टंट केले जात असून भाजप लोकहीतासाठी काम करतोय.
निवडणूकीत जनतेचा कौल न मिळाल्याने असलेल्या पोटशोळातून काहीजण फेक नरेटीव्ह पसरवत असल्याचा टोला त्यांनी हाणला. तसेच काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. २४ तासात दुसर आलेलं उत्तर यातून शिवसेनेतच गटतट असल्याचे दिसून येत असल्याचा पलटवार ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी केला. यावेळी भाजप शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, सभापती दिलीप भालेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, संतोष तळवणेकर आदी उपस्थित होते
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








