
कुडाळ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील ३३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जयराम (संदेश) शामराव सावंत (वय ३३, रा. तेर्से बांबर्डे) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, जयराम सावंत यांनी आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला. ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, जयराम यांनी इतके टोकाचे पाऊल नेमके का उचलले? यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
ताजी बातमी
View all

Sawantwadi News : सावंतवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
October 28, 2026

सावंतवाडीत महिला सक्षमीकरणाला चालना
October 28, 2026

दुचाकी अपघातातील गंभीर जखमी महिलेचे निधन
October 28, 2026

Devgad News : आंध्र प्रदेशातील कामगार देवगड बाजारपेठेत मृतावस्थेत
October 28, 2026
संबंधित बातम्या
View all

Sawantwadi News : सावंतवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
October 28, 2026

दुचाकी अपघातातील गंभीर जखमी महिलेचे निधन
October 28, 2026

Devgad News : आंध्र प्रदेशातील कामगार देवगड बाजारपेठेत मृतावस्थेत
October 28, 2026

Devgad Crime News : वळीवंडेतील चिरेखाणीवर वादातून दोघांना मारहाण
October 28, 2026




