LIVE UPDATES

जलस्रोत सक्षम करण्यासाठी आमदार निलेश राणे ॲक्शन मोडमध्ये

वराड तलावाच्या गाळ उपशाचे निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 19:04 PM
views 24  views

मालवण : मालवण तालुक्यातील वराड तलाव परिसराची पाहणी आमदार निलेश राणे यांनी केली. तलावाची सध्याची स्थिती आणि उपलब्ध पाणी साठवण क्षमतेचा आढावा घेतल्यानंतर तलावातील गाळ उपसा करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह आवश्यक त्या दुरुस्तीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लघु पाटबंधारे विभागासोबत बैठक घेऊन सविस्तर अहवाल तयार करावा, असे निर्देश आमदार निलेश राणे यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांना दिले.

या पाहणीवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वराड तलाव परिसराची पाहणी करताना तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. मात्र, गाळ साचल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी गळती व अन्य कारणाणी उपलब्ध क्षमतेचा पूर्णपणे वापर होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात गाळ उपसा, आवश्यक ठिकाणी दुरुस्ती तसेच इतर तांत्रिक उपाययोजना करून तलावाची क्षमता अधिक प्रभावीपणे वापरण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या.

तालुक्यातील जलस्रोत अधिक सक्षम करण्याबरोबरच पाणी पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर आमदार निलेश राणे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. उपलब्ध जलस्रोतांचा दीर्घकालीन आणि प्रभावी वापर होण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.