LIVE UPDATES

मालवण येथील युवतीचा रेल्‍वे प्रवासात आकस्‍मिक मृत्यू

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 20:16 PM
views 59  views

कणकवली :  कुटुंबासमवेत मांडवी एक्‍सप्रेसने ओरोस येथून मुंबईकडे जात असताना कांजुरमार्ग-मुंबई येथील सानिका पंढरीनाथ परब (२६, मुळ रा. वायंगवडे, मालवण) हिला प्रवासात अस्‍वस्‍थ वाटू लागल्‍याने नातेवाईकांनी तिला उपचारासाठी कणकवलीतील खाजगी रुग्‍णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी तिला कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी ११.४५ पूर्वी घडली. याबाबतची खबर गुरुनाथ दिगंबर परब (रा. मुंबई) यांनी कणकवली पोलिसात दिली. याप्रकरणी आकस्‍मिक मृत्‍यू म्‍हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.