
दोडामार्ग : एज्युमीट अकॅडमी, महाराष्ट्र आयोजित भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवंत गौरव सोहळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा दोडामार्ग नं. १ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पालकवर्ग, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, दोडामार्ग नं. १ यांच्या मुख्याध्यापिका श्रीमती एकता नाईक यांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. तसेच शिक्षिका श्रीमती सुप्रिया गोसावी यांचा गुणवंत विद्यार्थी घडविल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कु. अद्विका काळे हिचाही विशेष गुणवंत विद्यार्थिनी म्हणून गौरव करण्यात आला.
भारत टॅलेंट सर्च परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तालुकास्तरीय गुणवत्ताधारक विध्यार्थी -देसाई साईश सुरेश, सावंत प्रियांश संजय, पाटील रुद्र लक्ष्मण, माने यशराज वीशल, कळणेकर उन्नती अजित, देशाई शुभ्रा कृष्णा, दळवी स्पृहा सुमित, गवस श्रेयश सतीश, गवस निधी यशवंत, कासार चैतन्य अमरनाथ, दळवी आरवी प्रशांत, कुंदेकर श्रीवर साईनाथ, धर्णे खुशी सत्यवान, जाधव श्रीशैल अमोल, नाईक अथर्व सोमनाथ, राणे मानस कृष्णकांत, कदम आदित्य दिलीप, पवार सक्षम सत्यवान, झोळबेकर मंगल कृष्णा, मणेरीकर स्वानंदी महेंद्र, गवस श्रद्धा संजय, कळणेकर वेदिका अजित, देशाई चैताली गोविंद, सावंत वेदा समीर, देशाई दिव्या विलास तसेच जिल्हा गुणवत्ताधारक विध्यार्थी -सुतार उत्कर्ष किरण, काळे अद्विका दिगंबर, गवस प्रतिक्षा प्रमोद आणि सावंत अदिती संदीप या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दोडामार्ग पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. यशवंत गवस, प्रमुख पाहुणे कनिष्ठ अभियंता महामार्ग विभाग रत्नागिरी भारत सरकार म श्री. रोहित गवस माजी केंद्रप्रमुख श्री. गुरुदास कुबल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुमित दळवी सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय गवस, मुख्याध्यापिका श्रीमती एकता नाईक, पालकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तालुका केंद्रसंचालक श्री. संतोष ज्ञानेश्वर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप सुरेश सावंत यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. प्रशांत निंबाळकर यांनी केले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सातत्यपूर्ण परिश्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक जोमाने अध्ययन करण्याची प्रेरणा मिळाली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.











