
सिंधुदुर्ग : महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात आली. 3 ट्रक चालकांनी न्यायालयात भरला 30 हजार रुपये दंड भरला असून कारवाईत सातत्य ठेवणार असून वाहनचालकांनी मद्यसेवन टाळावे. अस आवाहन महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी केलं आहे.
संपूर्ण राज्यात मद्यसेवन करून वाहन चालविल्याने गंभीर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.त्या अनुषंगाने वाहन चालकांवर आळा बसविण्यासाठी अलिकडेच पदभार घेतलेले पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी मद्यपी चालकांवर धडक कारवाईचे आदेश महामार्ग पोलिसांना दिलेले आहेत. महामार्ग पोलीस अंमलदार ASI गवस,HC बिर्जे एकनाथ सरमळकर ,PN नितीन शेट्ये, PC लक्ष्मण परब, रवि इंगळे,पांडुरंग खडपकर या अंमलदारानी वैभववाडी तळेरे या राज्यमार्गावर 3 मद्यपी वाहन चालकांवर कणकवली न्यायालयात केलेल्या कारवाईत प्रत्येकी 10 हजार प्रमाणे एकूण 30 हजार दंड भरणा केला. मागील महिन्यात महामार्गावर 4 मद्यपी वाहन चालकावर अशीच कारवाई केलेली होती.त्यांचे कडून एकूण 40 हजार असा एकूण 70 हजार रुपये दंड न्यायालयात मद्यपी चालकांनी भरलेला आहे.










