LIVE UPDATES

'कोकणसाद'ची महा-रील स्पर्धा

'बदलतं कोकण' दाखवा...जिंका रोख बक्षिसे | ३७ व्या वर्धापन दिनाचं औचित्य
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 15, 2026 20:53 PM
views 40  views

सिंधुदुर्ग : महामार्ग, डिजिटल क्रांती, पर्यटनाचा कायापालट आणि पायाभूत सुविधांचा वेगवान विस्तार... होय, आपला लाडका कोकण आता बदलतोय आणि प्रगतीची नवी कहाणी लिहितोय! याच बदलत्या आणि गतिमान कोकणचे वैभव जगाच्या पटलावर आणण्यासाठी 'कोकणसाद'च्या वर्धापन दिनानिमित्त सोशल मीडिया गाजवायला येत आहे 'महा-रील स्पर्धा २०२६'. स्मार्टफोन उचला, कल्पकतेला कॅमेऱ्याची साथ द्या आणि "बदलतं कोकण!" या थीमवर एक भन्नाट रील बनवून हजारो रूपयांची रोख बक्षिसे मिळविण्‍याची संधी उपलब्‍ध झाली आहे."बदलतं कोकण!" या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून कोकणातील कल्पक तरुणांना आणि रील मेकर्सना आपल्या कॅमेऱ्याच्या नजरेतून कोकणची नवी यशोगाथा मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या डिजिटल क्रिएटर्ससाठी बक्षिसांचा मोठा वर्षाव करण्यात आला असून, प्रथम पारितोषिक ११,१११/-, द्वितीय पारितोषिक ७,७७७/-, तृतीय पारितोषिक ५,५५५/-, 'मोस्ट पॉप्युलर रील'साठी ५,५५५/- आणि पाच स्पर्धकांसाठी प्रत्येकी  १,१११/- अशी उत्तेजनार्थ रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. 

या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ पारंपरिक निसर्गसौंदर्य न दाखवता, कोकणात झालेली डिजिटल क्रांती, नवनवीन हायवे आणि रस्ते, दर्जेदार पायाभूत सुविधा, पर्यटन क्षेत्राचा झालेला कायापालट आणि स्थानिक पातळीवर झालेली गतीमान प्रगती यांचे उत्कृष्ट सादरीकरण रीलमध्ये असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी 'कोकणसाद LIVE' च्या अधिकृत Instagram आणि Facebook पेजला फॉलो करणे तसेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करणे बंधनकारक आहे. रील पोस्ट करताना Instagram वर @KokansadLive या अधिकृत हँडलसोबत 'Invite Collaborator' करणे अनिवार्य असून, व्यवस्थापनाने हे कोलाबरेशन स्वीकारल्यानंतरच रील अधिकृतपणे पात्र धरली जाईल. तांत्रिक निकषांनुसार रीलचा कालावधी ३० ते ६० सेकंद आणि व्हिडिओ क्वालिटी HD असावी, तसेच पार्श्वसंगीत वापरताना कॉपीराईट नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. 

याशिवाय, रीलची सुरुवात होताना किंवा रीलच्या दरम्यान 'कोकणसाद LIVE' प्रस्तुत श्री विनायक सुझुकी कुडाळ प्रायोजित ('बदलतं कोकण')" असा स्पष्ट ऑडिओ किंवा व्हिडिओ टेक्स्ट उल्लेख असणे अनिवार्य आहे. रील पोस्ट करताना कॅप्शनमध्ये #KokansaadLive, #BadaltaKokan, #KokanReels आणि #KokanNews हे हॅशटॅग वापरणे आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या किमान ५ मित्रांना टॅग करून "तुम्हाला बदलत्या कोकणात काय आवडतं? कमेंट करा" असे आवाहन करणे सक्तीचे आहे. ही स्पर्धा १७ जुलै २०२६ ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत चालणार असून, विजेत्यांची घोषणा 'कोकणसाद LIVE' चॅनलवर थेट (LIVE) प्रक्षेपण करून केली जाईल. प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसे तज्ज्ञ परीक्षकांद्वारे ठरवली जातील, तर 'मोस्ट पॉप्युलर रील'चे बक्षीस ओरिजिनल लाईक्सवर आधारित असेल. 

 या महारिल स्‍पर्धेचे प्रायोजक श्री विनायक सुझुकी, कुडाळ हे आहेत. या स्‍पर्धेचा निकाल कोकणसाद LIVE च्या अधिकृत पेजवर जाहीर  करण्‍यात येईल, असे ‘कोकणसाद’ मिडियातर्फे कळविण्‍यात आले आहे. स्‍पर्धेच्‍या अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी  (व्‍हॉटसॲप : 9112247479) येथे संपर्क साधा.