
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते कै. महेश नार्वेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कणकवली व्यापारी संघातर्फे वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन 7 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भालचंद्र महाराज संस्थान कणकवली येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे , सुरेश कामत अध्यक्ष भालचंद्र महाराज संस्थान, प्रसाद पारकर माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, संजय सावंत अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, पंकज पाटील वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रूग्णालय कणकवली हे उपस्थित राहणार असून या शिबिराचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 07 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या शिबिरात आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड काढून मिळणार आहे व अत्यंत आवश्यक असलेल्या सर्व टेस्ट मोफत करण्यात येणार आहे. याची नोंद घेण्यात यावी. हे शिबिर सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे सर्व नागरिकांनी तपासण्याकरिता उपाशी पोटी यावे ही विनंती. तिथे चहा नाष्टा याची सोय करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर व महिला व्यावसायिक संघटना कणकवली यांच्या अध्यक्षा सौ संजना काकडे यांनी केले आहे.












