LIVE UPDATES

महेश संसारे ‘वसंतराव नाईक राज्यस्तरीय शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 02, 2026 17:38 PM
views 36  views

वैभववाडी : तालुक्यातील मांगवली गावचे प्रगतिशील शेतकरी महेश रामदास संसारे यांना सन २०२३ चा राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’  राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कृषी दिनानिमित्त मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे झालेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले. 

श्री. संसारे हे प्रगतशील शेतकरी आहेत. शेतीसोबत दुग्धपालन याचाही व्यवसाय करतात. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब, सेंद्रिय शेतीचा प्रसार, शेतीपूरक व्यवसायाची यशस्वी उभारणी केली आहे. यापूर्वीही त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव झाला असून, राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. तसेच कृषीथॉन, नाशिकतर्फे ‘आदर्श दुग्ध उत्पादक’ पुरस्कार आणि जिल्हा परिषदेकडूनही त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी  निवड केली होती. कृषी दिनी संसारे यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला  कृषिमंत्री दत्तात्रय भरणे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री. संसारे यांच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.