LIVE UPDATES

सावंतवाडी नगरपालिकेचा दवाखाना सुरूच राहणार

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाहणी ; येत्या सोमवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 01, 2026 12:36 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : नगरपालिकेचा दवाखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू दिला जाणार नाही यासाठी नगराध्यक्षांनी घेतलेल्या पुढाकाराला यश आले आहे. नगराध्यक्षांच्या मागणी पत्राच्या अनुषंगाने आज जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी आणि त्यांच्या टीमने नगरपालिका दवाखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली. येत्या चार दिवसांत डॉक्टर व पूर्ण वैद्यकीय टीम उपलब्ध करून दिली जाणार असून येत्या सोमवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.

सावंतवाडी येथे सध्या सुरू असलेले 'नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र' हे नगरपालिका दवाखान्यातून चालवले जाणार आहे. यामुळे नगरपालिका दवाखान्याची आरोग्य सेवा पूर्ववत सुरू होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नगराध्यक्षांनी नगरपालिकेचा दवाखाना नियमित सुरू राहावा यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सिद्धार्थ भांबुरे, देवा टेमकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.