LIVE UPDATES

जिल्हा व्यापारी महासंघाच्या जिल्हा कार्यकारणी सभेत विविध प्रश्नांवर चर्चा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 11:01 AM
views 15  views

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची जिल्हा कार्यकारणी सभा बुधवारी सायंकाळी ४ वाजता दोडामार्ग येथील रमाबाई हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी ३१ जानेवारी रोजी दोडामार्ग येथे आयोजित करण्यात येणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्याच्या नियोजनासह व्यापारी बांधवांच्या विविध प्रश्नांवर या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सभेत अन्नसुरक्षा कायद्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करणे, महिला व्यापारी संघटनेची स्थापना, नवीन सभासद नोंदणी, जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा दौरा आयोजित करणे, आपत्ती व्यवस्थापन तसेच महासंघाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले. आगामी व्यापारी एकता मेळावा यशस्वी करण्यासाठी नियोजन आणि संघटनात्मक बांधणीवरही भर देण्यात आला.

सभेचे अध्यक्षस्थान महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी भूषविले. यावेळी दोडामार्ग तालुका व्यापारी संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष सागर शिरसाट यांसह संतोष नानचे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या सभेला महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कार्यवाह राजू जठार, उपाध्यक्ष दीपक भोगले, पुंडलिक दळवी, कोषाध्यक्ष ॲड. नंदन वेंगुर्लेकर, सहकार्यवाह राजन नाईक, जिल्हा कार्यकारणी सदस्य नंदू टोपले, संतोष नानचे, अशोक गाड, अरविंद नेवाळकर, हर्षल बांदेकर, बाळासाहेब बोर्डेकर, अश्विन पांगम, कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष पी. डी. शिरसाट, सावंतवाडी तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सागर शिरसाट, माजी अध्यक्ष नितीन वाळके, नितीन तायशेटे, द्वारकानाथ घुर्ये यांच्यासह जिल्ह्यातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेचे दोडामार्ग तालुका व्यापारी संघाने उत्कृष्ट आयोजन केले. आगामी व्यापारी एकता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेमुळे जिल्ह्यातील व्यापारी संघटनात्मक एकजुटीला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

घाडीगांवकर समाजाचं २२ नोव्हेंबरला स्नेहसंमेलन
November 19, 2026
रिक्षाचालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
November 18, 2026
शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
समान नागरी कायद्याबाबत २१ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

घाडीगांवकर समाजाचं २२ नोव्हेंबरला स्नेहसंमेलन
November 19, 2026
शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
समान नागरी कायद्याबाबत २१ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी
November 18, 2026
Sindhudurg district administration planning the Ghar Ghar Samvidhan initiative for Constitution Day 2026.
Ghar Ghar Samvidhan : ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन
November 18, 2026