
कणकवली : क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई संस्थेच्या अंधेरी विभागाने समस्त घाडीगांवकर समाजाचे स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. समाजातील सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवक-युवती आणि बालमित्र यांच्यासहसमाजातील प्रत्येक कुटुंबाने एकत्र यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, नवीन पिढीचा परस्पर परिचय व्हावा आणि आपुलकी, बंधुभाव व एकोपा अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन रविवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मांगल्य मंगल कार्यालय (जोगेश्वरी पूर्व -मुंबई) येथे होणार आहे.संमेलनात घाडीगांवकर समाजातीलच कवींचे कवी संमेलन मुख्य आकर्षण असणार आहे. संमेलनाला घाडीगांवकर समाजातील बांधवांनी सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन अंधेरी विभागाचे अध्यक्ष विजय घाडीगांवकर, मध्यवर्ती सदस्य आत्माराम गांवकर ,सचिव सचिन गांवकर, खजिनदार विलास गांवकर, संस्थेचे राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख विजय गांवकर यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








