LIVE UPDATES

सासोली जमीन प्रश्नावर जयंत पाटील यांची ग्रामस्थांशी चर्चा

सामायिक जमिनींची केली पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 08:13 PM
views 71  views

दोडामार्ग : तालुक्यातील सासोली जमीन प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी उपस्थित स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या सर्व व्यथा मांडल्या. यावेळी सासोली ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा शब्द आमदार जयंत पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी सामायिक जमिनींची पाहणी देखील केली.

सासोली येथील श्री सातेरी मंदिरात ही बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी आ. जयंत पाटील यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस, नगरसेवक चंदन गावकर, संदीप गवस, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, मदन राणे, संदेश राणे, सिद्धेश राणे, संतोष मोर्ये, उल्हास नाईक, सिद्धू कासार, एकनाथ नाडकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या व्यथा आमदार पाटीलांसमोर मांडल्या. यावेळी आ. पाटील म्हणाले की, तुमचा लढा असाच ठेवा. तुमच्या हक्कासाठी आणि लढ्यासाठी मी सर्वतोपरी न्याय देण्यासाठी प्रयत्न करीन असा विश्वास यावेळी त्यांनी दिला. सातेरी मंदिर येथे बैठक संपन्न झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांसोबत आ. पाटील यांनी सामायिक क्षेत्रातील जमिनीची पाहणी केली.


ताजी बातमी

View all

कुडाळमध्ये शिवसेना शहरच्यावतीने जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा २०२६चे आयोजन
November 05, 2026
सातार्डा चेकपोस्ट दारू तस्करी प्रकरणात आणखी तिघांना अटक
November 05, 2026
नेरूरमध्ये ७ नोव्हेंबर रोजी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन
November 05, 2026
नेरूर मतदारसंघातील पशुपालक शेतकऱ्यांना मोफत मका बियाण्यांचे वाटप
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

कुडाळमध्ये शिवसेना शहरच्यावतीने जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा २०२६चे आयोजन
November 05, 2026
नेरूरमध्ये ७ नोव्हेंबर रोजी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन
November 05, 2026
नेरूर मतदारसंघातील पशुपालक शेतकऱ्यांना मोफत मका बियाण्यांचे वाटप
November 05, 2026
जयंत पाटलांची पोलखोल करणार
November 05, 2026