LIVE UPDATES

उंबर्डेच्या संदेश तुळसणकर यांना मानद डॉक्टरेट

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 10, 2026 18:03 PM
views 27  views

वैभववाडी :  तालुक्यातील उंबर्डे गावचे सुपुत्र तथा अर्जुन रावराणे विद्यालयाचे  शिक्षक संदेश तुळसणकर यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एशियन वेदिक रिसर्च अकाडमीतर्फे मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) पदवी प्रदान करण्यात आली.

  शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री.तुळसणकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच सामाजिक जनजागृती आणि समाजहिताच्या उपक्रमांमध्येही त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अकाडमीतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याने श्री तुळसणकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव झाला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.