
सावंतवाडी : बांदा एसटी बसस्थानकाच्या मागील परिसरात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन उदय गोविंद सावंत (वय ५५, रा. मोर्येवाडी, बांदा) या व्यक्तीने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह एसटी स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मृताचे भाऊ उमेश गोविंद सावंत यांनी बांदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिताकांत नाईक करीत आहेत.











