
देवगड : दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यावर मोबाईल फेकून तिला दुखापत केल्याप्रकरणी तसेच तिच्या अंगावर धावत जात धक्काबुक्की केल्याप्रकरणी जामसंडे बाजारपेठ येथील संतोष तुकाराम शिंदे (वय ३२) याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ मे रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अर्चना संतोष शिंदे (वय २५) यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संतोष शिंदे याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यावर मोबाईल फेकून मारल्याने तिला दुखापत झाली. त्यानंतर तिच्या अंगावर धावत जात धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी देवगड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.











