LIVE UPDATES

सावंतवाडीची आमसभा ६ ऑगस्ट रोजी

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 18:20 PM
views 26  views

सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा येत्या गुरुवार ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी दिली.सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा यापूर्वी २९ डिसेंबर २०१६ रोजी संपन्न झाली होती. अनेक वर्षांनी ही आमसभा होत आहे. या सभेमध्ये मागील इतिवृत्त मंजूर व ठराव, सूचनांची कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर विविध विभागांच्या सण २०२५ - २६ मध्ये झालेल्या योजना निहाय कामांचा आढावा घेतला जाईल.सन २०२६- २७ या आर्थिक वर्षामध्ये करावयाच्या कामकाजाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे तसेच अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा होणार आहे, असे गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी सांगितले.