LIVE UPDATES

सतीश सावंत यांच्या हस्ते मोफत हळद बियाणे वाटप

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 02, 2026 19:05 PM
views 26  views

कणकवली  : जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी हंगामात लागवडीसाठी मोफत हळद बियाणे वाटप शेतकरी सेवा सोसायटीमध्ये झाले. ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली होती अशा ३४ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात  बियाणे वाटप केले.

यावेळी चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन शेखर सावंत, माझी चेअरमन महादेव उर्फ संतोष सावंत, माजी सरपंच लक्ष्मण उर्फ आबा सावंत, तुषार सावंत, पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेश सावंत पोलीस पाटील बाळकृष्ण सावंत प्रकाश घाडीगावकर नंदू मेस्त्री, सीमा सावंत विनिता सावंत, सचिव श्रद्धा सावंत आधी मान्यवर उपस्थित होते. 

खरीप हंगामामध्ये शेती पूरक व्यवसाय म्हणून हळद लागवडी ही उपयुक्त ठरत आहे गेल्या काही वर्षापासून सतीश सावंत यांनी बचत गटाच्या माध्यमातून हळद वाटप उपक्रम सुरू केला होता याचाच एक भाग म्हणून गावातील प्रत्येक शेतकऱ्याला मोफत हळद बियाणे वाटप सोसायटीच्या वतीने करण्यात आले. पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 25 किलो बियाणे वाटप करण्यात आले यासाठी सातबारा आणि आधार कार्ड घेऊन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती.