
सिंधुदुर्ग : छात्रालय माजी विद्यार्थी फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार , २६ जून २०२६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता दयासागर छात्रालय रोणापाल, छात्रालयात एका विशेष सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
भाजप ओरोस मंडल अध्यक्ष सन्माननीय आनंद उर्फ भाई सदानंद सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्माननीय भाई सावंत यांनी दिलेल्या वह्यांचे वाटप यावेळी छात्रालयातील विद्यार्थ्यांना करण्यात आले.
तसेच याच कार्यक्रमात छात्रालय माजी विद्यार्थी फाउंडेशनचे सदस्य श्री. सौरभ देसाई आणि मित्रपरिवाराकडून विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच श्रीनिधी गवस यांच्याकडून उपयुक्त शैक्षणिक साहित्य आणि खाऊवाटप तर शांताराम परब यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छात्रालय माजी विद्यार्थी फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलला पाहिजे; छात्रालय माजी विद्यार्थी फाउंडेशनचे असे उपक्रम समाजाला नवी दिशा देणारे आहेत, असे गौरवोद्गार ॲड. प्रणिता कोटकर-राऊळ मॅडम यांनी काढले.
या कार्यक्रमात छात्रालय माजी विद्यार्थी फाउंडेशनचे उपाध्यक्ष विवेक गवस, सचिव हर्षदा परब-मोरजकर, सहसचिव शांताराम परब, सल्लागार ॲड. प्रणिता कोटकर-राऊळ, सौरभ देसाई, श्रीनिधी गवस,राकेश गवस, आदी सदस्य उपस्थित होते. ॲड.भक्तराज राऊळ, विहांश सावंत, स्वामी मोरजकर, मंगल कामत, जिवबा वीर, साक्षी पोखरे हे देखील उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी फाऊंडेशनचे आभार मानले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा परब मोरजकर हिने केले तर आभार छात्रालय व्यवस्थापक जीवबा वीर यांनी मानले.











