LIVE UPDATES

चाकरमान्यांसाठी एसटी धावणार सुसाट

गणेशोत्सवासाठी देवगड आगार सज्ज ; मुंबई-पुण्यासह प्रमुख मार्गांवर जादा बसफेऱ्या
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 02, 2026 13:02 PM
views 33  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड / प्रतिनिधी 

गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या देवगड आगाराने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. ४ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेरील विविध मार्गांवर जादा बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे तसेच अन्य भागांतून देवगड तालुक्यात येणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगार सज्ज झाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी दिली.

मुंबई मार्गावर देवगड-बोरीवली (तळेरे मार्गे) बस दुपारी ३.३०, ३.४५, ४, ४.१५, ४.३०, ४.४५ व सायंकाळी ५ वाजता सोडण्यात येणार आहे. देवगड-मुंबई (तळेरे मार्गे) बस दुपारी ४.१५, ४.३० व ४.४५ वाजता धावणार आहे.याशिवाय देवगड-कुर्ला नेहरूनगर बस दुपारी ४ व ४.३० वाजता, देवगड-ठाणे बस दुपारी ४.१५ वाजता, तर देवगड-नालासोपारा बस दुपारी ३ वाजता सोडण्यात येणार आहे.

पुणे मार्गावर देवगड-पुणे (वल्लभनगर) बस सकाळी ८.१० वाजता तसेच सायंकाळी ५ व ५.२० वाजता उपलब्ध राहणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार आणखी बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

गणेशोत्सवासाठी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी एसटीच्या जादा बससेवेचा लाभ घ्यावा तसेच शक्य असल्यास आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन देवगड आगार व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.