
देवगड : भारतीय जनता युवा मोर्चाचे देवगड तालुकाध्यक्ष अमित साटम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगलेवाडी येथे लॅपटॉप भेट देण्यात आला. डिसेंट ग्रुप, चाफेड आणि चाफेडचे सरपंच साहिल पांचाळ यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेता यावे आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शाळेला लॅपटॉप भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.वाढदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान देण्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.











