
दोडामार्ग : दुष्काळजन्य परिस्थितीत आपलं आरोग्य चांगल राहिलं पाहिजे, आणि विशेष करून दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज १४ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ''भव्य मोफत महाआरोग्य शिबिरा''चे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे माजी सरचिटणीस तथा भारतीय जनता युवा मोर्चा गोवा प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर यांच्या हस्ते होणार आहे.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी १०. ०० वाजता या भव्य आरोग्य शिबिराचे प्रमुख पाहुणे भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, त्यांच्याबसोबत गोवा प्रदेशचे सचिव तन्वेश केणी, सह प्रभारी सानिल उदेईकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे . यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











