
कणकवली : पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशानंतर नगरपंचायत हद्दीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर कडे जाणाऱ्या स्त्यावरील खड्डे रविवारी एका रात्रीत सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजविले आहेत त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे . दरम्यान , कोकणसाद लाईव्हने या खड्डयांसंदर्भात आपल्या वृत्तातून लक्ष वेधले असता तातडीने याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते . त्यानंतर तातडीने बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविले असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे .











