LIVE UPDATES

ग्रंथपाल नांदी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महेश इंगळे

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 26, 2026 14:58 PM
views 34  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुणे येथे पुढील वर्षी २८ ते ३१ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ९९ नांदी साहित्य संमेलने घेण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत अक्कलकोट येथे २५ ऑगस्ट रोजी ग्रंथपाल नांदी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महेश इंगळे यांची निवड करण्यात आली.

 महाराष्ट्र साहित्य परिषद, अक्कलकोट शाखेच्या बैठकीत स्वागताध्यक्ष म्हणून महेश इंगळे यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. शाखेच्या अध्यक्षा शैलशिल्पा जाधव यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांच्या निवडीमुळे अक्कलकोटच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शतक महोत्सवी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या नांदी साहित्य संमेलनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या माध्यमातून साहित्य, वाचन संस्कृती आणि विविध साहित्यिक उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अक्कलकोट येथे झालेल्या ग्रंथपाल नांदी साहित्य संमेलनातही साहित्यप्रेमी, लेखक, कवी, वाचक तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग राहिला.

महेश इंगळे हे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असून अक्कलकोट नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी यापूर्वी नगराध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंगळे यांची साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे.


अक्कलकोट येथे झालेल्या या नांदी साहित्य संमेलनामुळे शहरातील साहित्यिक वातावरणाला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात साहित्यविषयक विविध उपक्रमांना अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.